व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणे, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील असलेल्या 80 पेक्षा अधिक शिवभोजन थाळी केंद्रांना गेल्या तीन महिन्यांपासून निधी मिळाला नाही. जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा निधी असला, तरी केवळ कर्मचार्यांअभावी हा तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने केंद्रांना त्याला सामोरे जावे लागत आहे.
पुणे शहरात 41 आणि जिल्ह्यात 41 असे एकूण पुणे जिल्ह्यात 82 शिवभोजन थाळी केंद्रे कार्यरत आहेत. त्या केंद्रांना एका थाळीमागे शहरात 25 आणि ग्रामीण भागात 35 रुपये अनुदान देण्यात येते. तर ग्राहकांकडून केंद्रांना 10 रुपये घेण्याची परवानगी आहे. शिवभोजन थाळी केंद्रांना अनुदान वितरण करण्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालयातील एक तहसीलदार पदावरील आहार वितरण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येते. या अधिकार्याच्या स्वाक्षरीनंतर कोषागारातून निधी वितरीत करण्यात येतो. केवळ या पदावरील अधिकारी अद्याप कार्यरत नसल्याने निधी वितरीत करण्यात आला नाही. जिल्ह्यातील केंद्रांना एका महिन्यासाठी 35 ते 40 लाख रुपयांचा निधी लागतो. मे महिन्यानंतर आतापर्यंतचा निधी तांत्रिक अडथळ्यामुळे वितरीत होऊ शकला नाही.
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रांचा निधी वितरण करण्याचे राहिले आहे ही वस्तुस्थिती आहे. केंद्रासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. मात्र, कर्मचाऱी अधिकार्यांची अद्याप काही पदे रिक्त आहेत. त्या तांत्रिक कारणास्तव हा निधी वितरीत करायचा राहिला आहे. मात्र लवकरच ही निधी वितरीत करण्यात येईल.
- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी
Discussion about this post