व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:- महाराष्ट्राच्या राजकारणात पाच दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडून येत आहेत.आपल्या संपूर्ण देशाचेच या महाराष्ट्र राज्याच्या सत्तानाट्या वर लक्ष केंद्रित झाले आहे. महाविकास आघाडीची सत्ता तरते की जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र राज्यातील होणाऱ्या या घडामोडीने देश विदेशातील लोकांचे ही लक्ष वेधून घेतले आहे.
गुवाहाटी येथील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये ४० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे सोबत आहेत. एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असणाऱ्या नेत्यांच्या बंडखोरीच्या विरोधात, काल परवा पासून महाराष्ट्र भर शिवसेनेच्या वतीने ,विविध भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ व त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शक्ती प्रदर्शन होत आहे.
आज आळंदीत शिवसेनेच्या वतीने ,उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवण्यासाठी,नगरपालिकेजवळ असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या येथे,
आळंदीतील शिवसैनिकांनी, बंडखोरी केलेल्या आमदारां विरोधात घोषणा बाजी केली.
या गद्दारांचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय! क्षमा नाही क्षमा नाही, गद्दारांना क्षमा नाही! महाराष्ट्र का नेता कैसा हो, उद्धव साहेब जैसा हो! आशा घोषणा केल्या.प्राणात प्राण असे पर्यंत शिवसेने सोबत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहू अशी प्रतिज्ञा करण्यात आली. छत्रपती महाराजांचा जय घोष करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना नेते उत्तम गोगावले,शहरप्रमुख अविनाश तापकीर,रमेश गोगावले, आनंद मुंगसे,अनिताताई झुझम,शशिराजे जाधव व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
Discussion about this post