व्हीएसआरएस मराठी न्युज प्रतिनिधी-
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालक संप पुकारला आहे.
3 जानेवारीपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. मात्र, त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. टँकर चालकही या संपात सहभागी असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर टाकी फूल्ल करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर, दुसरीकडे हा संप लांबल्यास एसटी महामंडळाच्या वाहतुकीवरही इंधन अभावी परिणाम होण्याची भीती आहे.
मालवाहतूकदारांच्या संपात पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी सहभाग घेतला आहे. पेट्रोल डिझेल तुटवडा पडू शकतो म्हणून पेट्रोल पंपावर लांबच रांगा पाहायला मिळत आहे.
पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील देखील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार असल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनने दिली आहे. राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही असेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
Discussion about this post