व्हीएसआरएस मराठी न्युज -श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड-प्राधिकरणच्या नूतन कार्यकारिणीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत श्री अग्रप्रेम समिती पॅनलला पराभूत करून श्री अग्रसेन सेवा संघ पॅनलचे सर्व सदस्य विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अग्रप्रेम समितीने दिलेली कडवी झुंज अपयशी ठरली.
मार्च २०२२ रोजी चिंचवड स्टेशन येथे असलेल्या ट्रस्टच्या सभागृहात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया संपन्न झाली. मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू राहिल्याने रात्री विजेत्यांची नावे घोषित करण्यात आले. ‘श्री अग्रसेन सेवा संघ’ पॅनलचे सर्व सदस्य भरघोस मताने निवडून आले.
याबाबतीत माहिती देताना विनोद बंसल म्हणाले की, श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरण मध्ये ७४४ नोंदणीकृत सदस्य असून ५११ सदस्यांनी आपल्या मताचा अधिकार गाजवला. अत्यंत शांततेत व कुठलाही वादविवाद न करता ही निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीच्या रिंगणात दोन्ही पॅनेलचे २३ उमेदवार उतरले होते. ‘श्री अग्रसेन सेवा संघ’ पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सुभाष बंसल, विनोद शिवनारायण बंसल, सुनील रामेश्वर अग्रवाल, विनोद मित्तल, जगदीश प्रसाद सिंघल, अशोक बंसल, सतपाल मित्तल, गौरव अग्रवाल, सीए के. एल बंसल, आनंद नत्थूराम अग्रवाल,जोगिन्दर मित्तल, संदीप गुप्ता, सुनील जयकुमार अग्रवाल, धर्मेंद्र अग्रवाल, सागर ओमप्रकाश अग्रवाल यांचा समावेश आहे. तर अग्रप्रेम समिती पॅनेलमध्ये अशोक आगरवाल, लजपत मित्तल, वेदप्रकाश गुप्ता, पवन मित्तल, सुजीत गर्ग, अपक्ष मध्ये अनिल आगरवाल, ओमप्रकाश केजरीवाल, सुधीरकुमार आगरवाल यांचा समावेश आहे.
Discussion about this post