व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे -अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये स्मृती इराणी यांनी घोषणा देऊन टीका केली. स्मृती इराणी यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला.
स्मृती इराणी यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला. हातवारे करीत पूर्ण सदन डोक्यावर घेतले होते या कृत्याच्या निषेधार्थ आज महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे ‘माफी माँगो माफी मांगो स्मृती इराणी माफी मांगो, भ्रष्टाचारीणी स्मृती इराणी या घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.
प्रसंगी निषेध व्य्क्त करताना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी म्हणाल्या की, ”बेकायदेशिरपणे बार चालविणाऱ्या स्मृती इराणीने आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल माफी मांगो हे बोलणे हस्यास्पद आहे. सोनिया गांधी या त्यागमूर्ती असून देशाचे पंतप्रधान पद त्यांनी सोडून दिले. स्मृती इराणी या स्वत: कोणत्या क्षेत्रातून आल्या आहेत आणि आपल्या मुलीला कोणत्या क्षेत्रात त्यांनी उभी केले आहे. हे आधी त्यांनी पहावे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टिका केलेली आम्ही कदापीही सहन करणार नाही. बीन संस्कारी सून स्मृती इराणी जर पुण्यामध्ये आल्या तर आम्ही त्यांना पुण्यात फिरणे मुश्किल करू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
Discussion about this post