व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी :-दि.३० आज सोमवती आमवस्ये निमित्त
आळंदी येथील खंडोबा मंदिरात
आळंदीतील भाविकांनी श्री खंडोबा च्या दर्शनासाठी गर्दी केली होती.सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक पूजा झाली.मोठ्या उत्साहात आळंदीतील नागरिक दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत होते.
त्यानंतर दुपार पर्यंत श्रींच्या चरणावर पाणी अभिषेक, मंदिरात तळी भंडार,मंदिरावर खोबरे भंडाऱ्याची उधळण झाली.
रात्री ८ वाजता आरती होऊन प्रसादाचे वाटप झाले.
कोरोनाच्या काळात जुने मंदिर पाडून काही महिन्यात च नवीन मंदिर संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व आळंदी ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे उभे राहिले.
बऱ्याच दिवसांनी तिथे येणाऱ्या
नागरिकांनी या नवीन खंडोबा मंदिराच्या कामाचे कौतुक ही केले.
Discussion about this post