व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –‘कृत्रिम तलाव’, कागदी लगद्याच्या श्रीगणेशमूर्ती आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्रीय संकल्पना राबवून गणेशमूर्तीची होणारी विटंबना थांबवावी !
पुणे – गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘ कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्रीय संकल्पना राबवून गणेशमूर्तीची घोर विटंबना होत आहे ती होऊ नये, तसेच ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या श्रीगणेशमूर्तीना प्रोत्साहन देऊ नये, तसेच त्यांच्या विक्री आणि विसर्जन यावर बंदी घालावी या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शासन,प्रशासन विभागास निवेदने देण्यात आली.
वरील दोन्ही निवेदने मा.आयुक्त,पुणे महानगरपालिका यांना देण्यात आली. निवेदने सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.सचिन इथापे यांनी स्विकारली. याविषयी सकारात्मक राहून कार्यवाही करू असे त्यांनी सांगितले. तसेच मा.उपआयुक्त, पर्यावरण विभाग,पुणे महानगर पालिका यांच्या कार्यालयातही निवेदने देण्यात आली.
पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री.संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे श्री. कृष्णाजी पाटील तसेच श्री.गोपाळ शिंदे, श्री.अंकुश जगताप, विपुल मांडके, श्री. दत्तात्रय कुलकर्णी, कु. अनुष्का घाडगे, कु.आकांशा घाडगे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांना २९ ऑगस्ट या दिवशी निवेदन देण्यात आले. त्यांनी कागदी लगद्यापासून गणपती बनवणे याबाबत विषय आणि हरित लवाद हा विषय जाणूनही घेतला. यावेळी समितीचे श्री.शैलेश येवले आणि श्री. रघुनाथ ढोबळे उपस्थित होते.
भोरचे नायब तहसीलदार श्री.मनोहर पाटील यांना निवेदन देण्यात आले, यावेळी शासनाने ही शाडू मातीची गणेश मूर्ती असावी याविषयी सांगितलेच आहे असे म्हणून या उपक्रमाचे कौतुक केले.
Discussion about this post