व्हीएसआरएस मराठी न्युज –मांजरी / पुणे
गेले सात दिवस मांजरी रेल्वेगेट येथे रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल प्रलंबित काम तातडीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी हाती घेण्यात आलेल्या साखळी उपोषणाला चिमुरड्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह उपस्थिती लावली.
रेल्वे उड्डाणपुलाचे काम ठप्प असल्याने स्कुलबस एका बाजूला लहान विद्यार्थ्यांना सोडत असून त्यांना मोठ्या धोकादायक पद्धतीने हे रेल्वेफाटक चालत जाऊन ओलांडावे लागत असल्याने, पालक व शाळाप्रशासनही चिंतेत असते. यामुळे तातडीने हे काम पूर्ण करण्याची मागणी मी मांजरीकर मंचच्या वतीने होत असून, त्याबाबत आपणास प्रशासनाकडून लेखी आश्वासन हवे असल्याची मागणी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया….
आपल्या परिसरातील के. के. घुले विद्यालय, PDI चे इंजिनिअरिंग कॉलेज , कल्याणी स्कुल, एस एन बी पी स्कूल , जिल्हा परिषद शाळा या साऱ्या नामवंत शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांचे या पुलाच्या कामाने अतोनात नुकसान झाले आहे. धोकादायक पध्दतीने हा पूल ओलांडताना काय अनर्थ होवू शकतो आणि या आधीही किती अपघात झाले आहे याची जाण असूनही आपल्या उदासीन कारभारामुळे आपण कुणाचेतरी जीवन धोक्यात घालण्याचे पाप करतोय ही जाण प्रशासनाला गेल्या ५ वर्षांत आलेली नाही.
– अजित दत्तात्रय घुले
Discussion about this post