व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-प्रभाग क्रमांक १३ निगडी सेक्टर २२ मधील मुस्लिम दफनभूमी मध्ये विविध कामे प्रलंबित आहेत. निधी अभावी अनेक कामे अर्धवट अवस्थेमध्ये असून मुस्लिम बांधवांना अंत्यविधी वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निगडी मुस्लिम दफनभूमीतील विविध कामासाठी भरीव निधी उपलब्ध करावा अशी मागणी मनसे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी केली आहे.
सचिन चिखले यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्षांमध्ये मुस्लिम दफनभूमीच्या सीमा भिंतीचे काम करण्यात आले. परंतु ते अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे, ते पूर्ण करण्यात यावे. त्यावरील नक्षीकाम काम पूर्ण करण्यात यावे व रंगरंगोटी करण्यात यावी. मुस्लिम दफनभूमीमध्ये असणारा पाथ वे ब्लॉक खचलेल्या अवस्थेत आहे, पूर्णपणे जीर्ण झालेले आहेत. त्यामुळे सर्व फुटपाथ नव्याने करण्यात यावेत.
मुस्लिम दफनभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी जी माती वापरण्यात येते ही माती खूप कमी असल्यामुळे जास्त वापर झाल्यामुळे तिची लेव्हल कमी झालेली आहे. त्यामुळे विधी करताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे नव्याने सर्व भागात लाल माती टाकण्यात यावी जेणेकरून अंत्यविधीसाठी बांधवांना त्रास होणार नाही. तसेच मुस्लिम दफनभूमीमध्ये बसण्यासाठी बेंच बसवण्यात यावेत, अशा विविध कामासाठी निगडी मुस्लिम दफनभूमीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.
Discussion about this post