व्हीएसआरएस मराठी न्युज –मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत ठाणे ते पुणे महामार्गावर ई-शिवनेरी बस उतरण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस नव्याने दाखल होणार आहेत. सध्या असलेल्या शिवनेरीच्या तिकीटाच्या तुलनेत ई शिवनेरीचे तिकीट कमी असणार आहे. महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे पासून ही नवी सेवा प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.
दरम्यान, इलेक्ट्रिक शिवनेरी बसमध्ये संपूर्ण वातानुकूलित, मोबाईल चार्जिंगसह अत्याधुनिक इन्फोटेन्मेंटची सुविधा मिळणार आहे. तर एकदा बॅटरी चार्ज झाल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे.
ई शिवनेरी बसची क्षमता
43 प्रवाशी
एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार
संपूर्ण वातानुकुलित बस
आरामदायी आसन व्यवस्था
मोबाईल चर्जिंगची सोय
बॅग ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्यामुळे येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. शिवाय तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे.
Discussion about this post