व्हीएसआरएस मराठी न्युज -चेनचोरी तसेच वाहनचोरी करणारे दहा जणांचे टोळके पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात अडकले आहे. या टोळक्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करीत 22 गुन्ह्यांची उकल केली आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे
महम्मद मुस्ताक सिद्दिकी (24, रा. लातूर), पांडुरंग बालाजी कांबळे (23, रा. लातूर), तुषार उर्फ बाळ्या अशोक माने (24, रा. तळेगाव दाभाडे), अर्जुन संभाजी कदम (25, रा. लातूर), पक्षाल मनोज
सोलंकी (23, रा. चिंचवड), मुराद दस्तगीर मुलानी (36, रा. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, त्यांच्या चार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोघांनाही पोलिसांनी अटक केली
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस
निगडी, चिखली, भोसरी परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती
मिळाली की, महिलांच्या अंगावरील दागिने, वाहनचोरी करणारे तसेच चिखली येथे तोडफोड केलेलेसंशयित आरोपी चिखली परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मोहम्मद, पांडुरंग, तुषार, अर्जुन आणि त्यांच्याचार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. तसेच चोरीचे दागिने विकणारे आणि विकत घेणारे पक्षाल व मुराद या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
92 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
या सर्वांकडून चार कोयते, एक तलवार, पाच दुचाकी, सात मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने असा एकूणचार लाख 92 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी पिंपरी चिंचवड शहरासह लातूर जिल्ह्यात देखील अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील चेन मोबाईल स्नॅचिंगच्या आरोपींना पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तू जप्त केल्या. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असून, त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून परिसरात शोध घेतला. काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. अशी माहिती डीसीपी स्वप्ना गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसीपी सतीश माने उपस्थित होते.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, डीसीपी स्वप्ना गोरे, एसीपी (गुन्हे) सतीश माने, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शाखा युनिट-2चे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, दीपक खरात, प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिश कुडके, नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, डॉ. शिवाजी मुंढे, संदेश देशमुख, उद्धव खेडकर.यांनी केली.
Discussion about this post