व्हीएसआरएस मराठी न्युज -शगुन चौकाजवळ महापालिकेच्या वतीने स्वागत कमान उभारण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पालिकेकडून सत्कार केला जात आहे.
विसर्जन घाटांवर महापालिकेकडून वैद्यकीय पथक नियुक्त केले आहे. तसेच रुग्णवाहिका दिली आहे. घाटावरील कर्मचारी व गणेश भक्त यांची आवश्यकतेनुसार उच्च रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी करून घेण्यात येत आहे. तसेच प्रथमोपचार सुविधा देखील उपलब्ध आहे.
भोसरी येथे जल्लोषात गणेश विसर्जन!
आकर्षक रथ सजावट, पारंपरिक ढोल ताशा पथक, शिवकालीन युध्दकलांची प्रात्यक्षिके अशा विविध स्वरूपात उत्साहाच्या वातावरणात भोसरी येथे जल्लोषात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार श्री. महेश लांडगे, विशेष अधिकारी श्री. किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी श्री. राजेश आगळे, माजी नगरसेविका श्रीम. भीमाबाई फुगे, पालिका अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
Discussion about this post