व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नर्हे, आंबेगाव येथे साकारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (दि.20) होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता लोकार्पण होणार असल्याची माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली.
शिवाजी महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री-डी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहेत. शिवसृष्टी प्रकल्पामध्ये 21 एकर परिसरात एक दिवसाची ‘ऐतिहासिक थीम पार्क’ची सफर शिवप्रेमींना करता येणार असून, महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील भवानीमातेचे मंदिर, शिवकालीन शस्त्रागार, दरबार, अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंदिर, विजयस्तंभ, राजवाडा, नगारखाना या ठिकाणी पाहायला मिळेल.
मॅड मॅपिंगसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिवप्रेमी थेट छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकू शकतील, हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा हा 1 डिसेंबरपासून शिवप्रेमींसाठी खुला होणार असून, यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही कदम यांनी नमूद केले.
Discussion about this post