व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गणपती विसर्जनाकरीता ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका देखील मोठ्या संख्येने निघत असतात.
मिरवणुका या रस्त्यावर आल्याने मिरवणुक पाहण्याकरिता नागरिकांची रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेने गर्दी होवुन वाहतुक कोंडी होत असते. त्यामुळे रस्त्यावरुन जाणारे वाहनचालकांना वाहतुक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले आहेत.
पिंपरी विभाग :
२८ सप्टेंबर दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत
बंद मार्ग : पिंपरी चौकाकडून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मार्गे. मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेटच्या मदर टेरेसा ब्रिजवरून काळेवाडी मार्गे.
बंद मार्ग : काळेवाडी पुलावरून डीलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म-मुंबई पुणे महामार्ग मार्गे.
बंद मार्ग : पिंपरी चौकातून गोकूळ हॉटेलकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : पिंपरी सर्विस रोडने क्रोमा शोरूम मार्गे.
दापोडी विभाग :
२८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत
बंद मार्ग : फुगेवाडी – दापोडी ओव्हरब्रीज मार्गे शितळादेवी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडून पुण्याकडे जाणारा मार्ग.
पर्यायी मार्ग : शितळादेवी चौकातून सांगवी मार्गे. फुगेवाडी चौकातून हॅरिस ब्रिजच्या अंडरपासमधून बोपोडी मार्गे.
वाकड वाहतूक विभाग :
वाहतूक बदलाचा कालावधी – २८ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत
बंद मार्ग : साठे चौक येथून दत्त मंदिर रोडवर जाण्यास मनाई.
पर्यायी मार्ग : कावेरीनगर किंवा काळा खडक चौक मार्गे.
बंद मार्ग : वाकड चौकाकडून दत्त मंदिर रोडवर जाण्यास मनाई
पर्यायी मार्ग : वाकड चौकातून कस्पटे कॉर्नर मार्गे.
बंद मार्ग : उत्कर्ष चौकाकडून दत्त मंदिर रोड वाकड येथे येणाऱ्या वाहनांना म्हातोबा चौक येथून प्रवेश बंदी.
पर्यायी मार्ग : कस्पटे कॉर्नर मार्गे.
गोलारीस हॉस्पिटल चौक दत्त मंदिर रोड तसेच सम्राट चौक दत्त मंदिर रोड येथील वाहतूक गरजेनुसार वळवली जाणार आहे.
चिंचवड वाहतूक विभाग :
वाहतूक बदलाचा कालावधी : २८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत
बंद मार्ग : अहिंसा चौक ते चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद
पर्यायी मार्ग : एसएएफ चौकातून खंडोबा माळ मार्गे.
बंद मार्ग : दळवीनगर ब्रिजकडून चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे.
बंद मार्ग : वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चापेकर चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसकेएफ-खंडोबा माळ मार्गे.
बंद मार्ग : लिंकरोडवरून चापेकर चौकातील पीएमटी बस थांबा येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी
पर्यायी मार्ग : लिंकरोडने डावीकडे वळून काळेवाडी मार्गे.
बंद मार्ग : भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी
पर्यायी मार्ग : केशवनगर मार्गे
बंद मार्ग : चिंतामणी चौक-वाल्हेकरवाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : चिंचवडेफार्म वाल्हेकरवाडी लंडन ब्रिज रावेत मार्गे.
बंद मार्ग : अहिंसा चौक व रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे. अथवा अहिंसा चौक ते महावीर चौक. अथवा एसकेएफ चौक मार्गे.
हिंजवडी वाहतूक विभाग :
वाहतूक बदलाचा कालावधी २८ सप्टेंबर दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत
बंद मार्ग : टाटा टी जंक्शन चौक – टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रीकल सर्कल व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : टाटा टी जंक्शन चौकाकडून लक्ष्मी चौक मार्गे.
बंद मार्ग : जॉमेट्रीकल सर्कल चौक – जॉमेट्रीकल सर्कल चौकाकडून मेझा 9 व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : टाटा टी जंक्शन चौक-लक्ष्मी चौक मार्गे.
बंद मार्ग : मेझा 9 चौक – मेझा 9 चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – लक्ष्मी चौक मार्गे.
बंद मार्ग – शिवाजी चौक – शिवाजी चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – शिवाजी चौक-विप्रो सर्कल फेज एक चौक-जॉमेट्रीकल सर्कल-टाटा टी जंक्शन मार्गे.
बंद मार्ग – कस्तुरी चौक – कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – विनोदे वस्ती कॉर्नर-लक्ष्मी चौक मार्गे.
बंद मार्ग – जांभूळकर जिम चौक – शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – इंडियन ऑईल चौक-कस्तुरी चौक-विनोदे वस्ती कॉर्नर मार्गे.
बंद मार्ग – इंडियन ऑईल चौक – जांभूळकर जिम व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – कस्तुरी चौकातून विनोदे वस्ती कॉर्नर मार्गे.
पिंपरी वाहतूक विभाग :
वाहतूक बदलाचा कालावधी २८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत
बंद मार्ग – पिंपरी चौकाकडून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद
पर्यायी मार्ग – पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मार्गे. मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेटच्या मदर टेरेसा ब्रिजवरून काळेवाडी मार्गे.\
बंद मार्ग – काळेवाडी पुलावरून डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म-मुंबई पुणे महामार्ग मार्गे.
बंद मार्ग – पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – पिंपरी सर्विस रोडने क्रोमा शोरूम मार्गे.
Discussion about this post