व्हीएसआरएस मराठी न्युज –
शिवसेना आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला तीन आठवड्यांची म्हणजे १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आमदार अपात्रता प्रकरणात सहा निकाल लावण्यासाठी अधिक लागणार असल्याने तीन आठवड्यांची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी विधीमंडळाकडून न्यायालयाला करण्यात आली होती.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र या प्रकरणात ३४ याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे सहा निकाल लागणार आहेत. २१ ते ३१ डिसेंबरपर्यंत या निकालाचे लेखन अशक्य आहे. त्यामुळे विधीमंडळाकडून वेळ मागवून घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने विधीमंडळाची ही मागणी मान्य करत १० जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणाचा १० जानेवारीपर्यंत निर्णय द्या, असे आदेशही दिले आहेत.
Discussion about this post