व्हीएसआरएस मराठी न्युज -आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली पाहायला मिळते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतरच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांकरता महाराष्ट्र काँग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडून प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आलीय. यात पाच राज्यांच्या निवडणुकांकरता अशोक चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, अतुल लोंढे , माणिकराव ठाकरे,नसिम खान यांच्याकडे प्रभारीपदाच्या तर नाना पटोले, विजय वड्डेटीवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांना सध्या केवळ पाच राज्यांच्या निवडणुकांकरता देण्यात आलेल्या जबाबदारीवर फोकस करण्याचे आदेश आहेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या तीन्ही प्रमुख पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत तयारीला सुरुवात केली. तर शिवसेना ठाकरे गटाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 19 जागांवर लक्ष केंद्रित करून या जागा पुन्हा जिंकण्याचा दावा केलाय. काँग्रेसने सुद्धा अशाच मतदारसंघाचा आढावा सुरू केलाय.
आता आढावा घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती लोकसभा निवडणुकीसंदर्भातील जागा वाटपाचा निर्णय घेणार आहेत
Discussion about this post