व्हीएसआरएस मराठी न्युज –ATM मशीनफोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे हिंजवडी पोलीसांच्याजाळ्यात अडकले आहेत. हिंजवडी पोलीसांनी ०३ चोरट्यांना अटक केली आहे. यामधील दोन चोरटे गावाला पळुन जाण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हि घटना गुरुवार (ता. १) रोजी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या येथे घडली होती.
१) आदित्य भीमराव कांबळे (वय २० वर्ष, रा. पिंपळे गुरव), २) विशाल बंडु कारके (वय २२ वर्ष, रा. चिखली), ३) प्रथमेश प्रकाश जाधव (वय २० वर्ष, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०१ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजुन वीस मिनिटाला नियंत्रण कक्षाला एक कॉल आला होता. या कॉलद्वारे अशी माहिती प्राप्त झाली होती की, म्हाळुंगे येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे ATM मशीन चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. नियंत्रण कक्षाने त्वरीत हि माहिती हिंजवडी पोलीसांना दिली. आलेल्या कॉलचे गांभीर्य लक्षात घेवुन हिंजवडी पोलीसांच्या तपास पथकाने गस्तीवर असलेले पोलीस उप- निरीक्षक रविंद्र मुदळ व इतर अधिकारी यांना सुचना देण्यात देण्यात आली. पोलीस पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी आजुबाजुला पाहणी केली असता ATM सेंटर जवळ एक इसम अंधारात लपुन बसलेला पोलीसांना दिसला. पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला.
पोलीसांनी त्याला ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव आदित्य कांबळे असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असतो तो आणि त्याचे दोन साथीदार एक्सेस दुचाकीवरुन येवुन बँकेचे ATM मशीन फोडण्यासाठी आले होते. ते दोघे पळुन गेले असल्याची
माहिती त्याने पोलीसांना
दिली.
तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहायक पोलीस उप-निरीक्षक मारणे, हवालदार केंगले, कुदळ, धुमाळ, शिंदे यांनी सातारा येथे पळुन जाण्याच्या तयारीत असताना पिंपळे गुरव परीसरातुन ताब्यात घेवुन अटक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उप-निरीक्षक बी. बी. मारणे हे करीत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापू देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, उप-निरीक्षक रविंद्र मुदळ, रमेश पवार, सहायक उप-निरीक्षक बी.बी. मारणे, बाळकृष्ण शिंदे, नागेश भालेराव, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, सचिन आगलावे, तोसिफ महात, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
Discussion about this post