व्हीएसआरएस मराठी न्युज -शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. निमित्त आहे ते ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचे.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रबोधनकारांची सर्व पुस्तके, पुस्तकबद्ध न झालेले साहित्य, विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख, त्यांनी पुस्तकांसाठी लिहिलेल्या प्रस्तावना असा साहित्यखजाना संकेतस्थळावर असेल.
Discussion about this post