व्हीएसआरएस मराठी न्युज आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
दि.२४ रविवार रोजी आळंदीत मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ असल्याने आळंदी शहरात विविध रस्त्यावर वाहतूक ही मोठ्या प्रमाणात दिसून आली.सुट्टीचा दिवस असल्याने भाविक ही माऊली मंदिरात आल्याचे दिसले.
त्याच बरोबर नुकतेच काही दिवसांपूर्वी नवीन बसवण्यात आलेल्या नो पार्किंगच्या फलका खालीच व त्यावर ठराविक लिहिल्या अंतराच्या आतच दुचाकी चारचाकी वाहने अवैधरित्या लागलेली दिसली.फुटपाथ लगत प्रदक्षणा रस्त्यावर दोन्ही बाजूने चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर लागलेली होती. त्यामुळे बराच वेळ वाहतूककोंडीची समस्या या शहरात निर्माण झालेली दिसली.प्रदक्षणा रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नव्याने लावण्यात आलेल्या नो पार्किंग फलकाचा ही प्रभाव काल शून्य दिसून आला. प्रदक्षणा रस्त्यावरील बेशिस्त अवैध वाहनांच्या पार्किंग मुळे भैरवनाथ चौक ते चाकण चौक,जोग महाराज शिक्षण संस्था,देहूफाटा या रस्त्यावर वाहनांच्या दूरवर रांगा दिसून आल्या होत्या.मंदिरालगत महाद्वार चौकात नो पार्किंग असणाऱ्या फलका खालीच दररोज दुचाकी वाहाने लावण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.महाद्वार चौकात दुचाकी वाहने लागू नयेत म्हणून वाहतूक पोलीस व नगरपरिषद यांनी समनव्य साधत तेथे कायम स्वरूपी दुचाकी वाहने लागू नये. म्हणून त्यावर कठोर कारवाई,ठोस भूमिका प्रशासनाने घ्यावी.अशी येथील काही नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी गावठाणात एका धर्मशाळेला आग लागल्याने तेथील रस्त्यावर लागलेल्या अवैध पार्किंग चे व कमी रुंदीचे रस्ते ही कारणे देत नगरपरिषदेची अग्निशमनदल गाडी घटनास्थळी पोहचली नसल्याची माहिती कळते.तेथील स्थानिक नागरिकांना वाटले होते या दुर्घटने चे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाचे डोळे उघडले असतील.
परंतु महाद्वार चौकात नो पार्किंग फलका खालीच दररोजच दुचाकी वाहने लागलेली दिसून येत असल्याने,ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला अपयश आलेले दिसून येत आहे.प्रदक्षणा रस्त्यावर व महाद्वार चौकात दंडात्मक कारवाई केली जाते.तरी सुद्धा बेफिकीरपणे निडरपणे तेथे बेशिस्तपणाने अवैध वाहने पार्किंग केली जात आहे.
Discussion about this post