व्हीएसआरएस मराठी न्युज –रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केल्याबद्दल भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही बिधुरी यांच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आणि पुन्हा असे झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. या घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील चिंता व्यक्त केली. दानिश अली यांनी बिधुरी यांच्यावर कारवाईची मागणी केली, तर काँग्रेसने त्यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी केली.
बघू भाजप कारवाई करते की नाही :दानिश अली
बिधुरी यांच्या वक्तव्यावर बसपा खासदार दानिश अली म्हणाले, ‘माझ्यासारख्या निवडून आलेल्या सदस्याची ही अवस्था असताना सामान्य माणसाची काय अवस्था असेल. मला आशा आहे, मला न्याय मिळेल, सभापती चौकशी करतील कारण मला हे सहन होणार नाही, मी संसद सोडण्याचा विचार करत आहे.
या सर्व घाडमोडीनंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो राहुल यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. ‘नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान’, असं त्याला कॅप्शन दिलं.
Discussion about this post