व्हीएसआरएस मराठी न्युज –नोकरीवर असणाऱ्या विश्वासू माणसाकडूनच मालकाची तब्बल सव्वा कोटींची फावणूक झाल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष मयेकर हा फिर्यादी यांच्याकडे सन 1990 पासून नोकर म्हणून कामाला होता. फिर्यादी काळभोर आणि भोंडवे यांच्या मालकीचे सहयोगनगर तळवडे येथे नंदादीप इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये 39 व्यावसायिक गाळे आहेत. त्या गाळ्यांचे भाडे वसुलीचे काम फिर्यादी यांनी संतोष मयेकर याला दिले होते. सन 2013 ते डिसेंबर 2021 या कालावधीत आरोपीने भाडेकरूंकडून भाडे रोख तसेच चेक स्वरूपात घेतले. ते भाड्याचे पैसे फिर्यादी अथवा त्यांच्या कुटुंबियांना न देता परस्पर स्वतःच्या आणि आरोपी साईल मयेकर याच्या बँक खात्यात जमा केली. यामध्ये फिर्यादी यांची एक कोटी 20 लाख 28 हजार 250 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.
याप्रकरणी शरद दिगंबर काळभोर (वय 57वर्षे , रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 11) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून संतोष यशवंत मयेकर, साईल संतोष मयेकर (दोघे रा. ताम्हाणेवस्ती, तळवडे) यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post