व्हीएसआरएस मराठी न्युज –कडक उन्हामुळे वाढलेली पाण्याची मागणी, तसेच, बाष्फिभवनामुळे पवना धरणाचा पाणीसाठा केवळ 16 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. पावसाने उशीरा हजेरी लावली. जून महिन्याच्या अखेरीपासून थांबत थांबत पाऊस सुरू झाला. तेव्हापासून ओढे, नाले, धबधबे व झरे वाहत आहेत. त्यामुळे धरणात हळूहळू पाणीसाठा वाढू लागला.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
धरणातील पाण्याची परिस्थिती!
गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 70 मिली मीटर
1 जूनपासून झालेला एकूण पाऊस – 1407 मिली मीटर
गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस – 1477 मिली मीटर
धरणातील सध्याचा पाणी साठा – 69.89 टक्के
गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 79.40 टक्के
पाऊस जोरदार सुरू असल्याने धरणातील येवा वाढला असून, पाणी पातळीत झपाट्याने वाढत आहे.
Discussion about this post