व्हीएसआरएस मराठी न्युज –चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान खंडोबाने राक्षसांचा नाश करून देव आणि लोकांचे रक्षण केले. तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडोबाबाबाची पूजा केली जाते. भगवान शंकराचे हे खंडोबा रूप शेतकरी, मेंढपाळ आणि शिकारी यांचे स्वामी मानले जाते. या दिवशी कार्तिकेय आणि खंडोबाबाबांची पूजा केल्याने सर्व दु:ख आणि दोष दूर होतात, असा समज आहे.
यंदा चंपाषष्ठीचा मुहूर्त 17 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 05:33 वाजता सुरू होईल आणि 18 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 03:13 वाजता समाप्त होईल. या दिवसाची विशेष शुभ वेळ सकाळी 07:07 ते 08:25 आणि सकाळी 09:42 ते 11:00 पर्यंत आहे. शतभिषा नक्षत्र आणि वैधृती योग यांच्या संयोगाने चंपा षष्ठी अधिक शुभ मानली जाते.
Discussion about this post