व्हीएसआरएस मराठी न्युज -विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व विविध प्रकारचे साहित्य हे ठरवलेल्या दुकानांतूनच खरेदी करावे लागते, खासगी शाळा विद्यार्थी, पालकांना, निवडक दुकानातूनच शैक्षणिक विकत घेण्यास भाग पाडतात. शाळांची ही प्रथा बंद करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
पालकांकडून ही विरोधी केला जातो. मुलांना त्रासदायक ठरू शकते म्हणून पालक तक्रारी करत नाहीत. या प्रथेला दिल्ली सरकारने फटकारत म्हंटले, असा नियम लावल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल. महाराष्ट्र राज्य शासनाने अधिसूचना काढल्यास पालकांना दिलासा मिळणार आहे, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.
खासगी शाळांकडून शुल्क वाढही केली जात आहे. त्यातच आता ठराविक दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याचा शाळांकडून लावण्यात येत असलेल्या तगाद्यामुळे पालक आणखी त्रस्त झालेले आहेत, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post