व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
खेड:दि.७ शनिवार रोजी मौजे वाघु ता. खेड जि. पुणे येथे आयोजित महिला बचत गट मेळावा व जीवदानी मंदिर जिर्णोध्दार कार्यक्रमास राज्यमंत्री कु. आदिती तटकरे ,आ. श्री. दिलीपअण्णा मोहिते पाटील उपस्थित होते. यावेळी सौ. निर्मलाताई पानसरे, दूध संघाचे संचालक श्री. अरुण चांभारे, सरपंच श्री. सावळा भोईर आणि बचत गटातील महिला सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
महिलांनी बचत गटाद्वारे वस्तू उत्पादनासोबत सेवा देण्यातही बचत गट पुढे येत आहेत. महावितरणचे विद्युत देयके वाटपाचे कामही काही महिला बचत गट करत आहेत. विविध क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन बचत गटांनी व्यवसाय करावा. शासकीय योजनांचा लाभ घेऊन व्यवसायाच्या विस्ताराकडे लक्ष देत या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
तसेच खेड तालुक्यातील दौऱ्या दरम्यान दि.६ शुक्रवार रोजी राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते खेड तालुक्यातील मौजे धामणे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे इमारतीचे उदघाटन झाले.कुरकुंडी येथील पुणे जिल्हा सहकारी बँक शाखेच्या नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात आलेल्या नवीन दालनाचे लोकार्पण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
Discussion about this post