व्हीएसआरएस न्युज किरीट सोमय्या हे आज पिंपरी चिंचवड शहरात भाजप नगरसेवक, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूध प्रमुख व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. या निमित्ताने किरीट सोमय्या यांचा दौरा पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित असून आज (दि.२१) दुपारी बारा वाजता मोरवाडी येथील भाजप कार्यालयात ते आपल्या भाजप पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत, अशी माहिती शहर भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे केली होती.
सोमय्या या आरोपांची चौकशी करणार नाहीत असे शिवसैनिकांना निदर्शनास आणून द्यायचे आहे, असे असले तरी किरीट सोमय्या आज दि.२१ पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या उद्या या भ्रष्टाचार संदर्भात काही बोलणार आहेत का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
Discussion about this post