व्हीएसआरएस न्युज पिंपरी, दि.१९ (प्रतिनिधी) डॉबिवली येथे रविवारी (दि. १४) झालेल्या जिम्नॅस्टिकच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील एलाईट फिटनेस अकॅडमीच्या हर्षदा काकडे हिने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
हर्षदा काकडे हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेतून निवड झालेला संघ जिम्नॅस्टिकच्या २२ ते २६ नोव्हेंबर रोजी जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे नेतृत्व करणार आहे.
या स्पर्धेतून हर्षिता काकडे हिच्यासह ठाण्यातील सृष्टी भावसार, केळकर, पुण्यातील रिया देवयानी कोलते, मुंबईची अनुष्का पाटील यांची निवड झाली आहे.
हर्षिता ही जिम्नॅस्टिकच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली खेळाडू असून तिला एलाईट पिंपरी-चिंचवडमधील पहिली फिटनेस अकॅडमीचे मनोज काळे, चैतन्य जोशी, प्रिया जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
Discussion about this post