व्हीएसआरएस न्युज पिंपरी भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा तर्फे आज 21 सप्टेंबर 2021 रोजी विशाल संपूर्ण आरोग्य संस्था मोरेवस्ती, चिखली या ठिकाणी आरोग्य संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सेवा सप्ताहाच्या निमित्ताने स्वच्छता जागरूकता अभियान अंतर्गत मोफत मास्क व सॅनिटायझर याचे वाटप करण्यात आले.
तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना हात साबणाने स्वच्छ धुण्याचे प्रात्यक्षिक युवा मोर्चा तर्फे देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष भाऊशेठ रासकर, भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजेश डोंगरे, शशिकांतजी पुंड, युवा नेते मयूर काळभोर, भाजपा ओबीसी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस नितीन साळी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजेशजी डोंगरे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी केले. विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेचे संस्थापक विशाल गुरव यांनी उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानले. सदर कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून करण्यात आला.
Discussion about this post