मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना कोरोनाच्या एन्ट्रीनं आता वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कमलनाथ यांनी राज्यातील काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे सर्व आमदार आमच्याशी संपर्कात असून ४४ पैकी ४१ आमदार बैठकीला उपस्थित होते. तर तीन आमदार मुंबईच्या दिशेनं येत आहेत, अशी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याच्या वृ्त्तालाही नाना पटोले यांनी पुष्टी दिली. उद्धव ठाकरेंची अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, पण आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आज सायंकाळपर्यंत पदाचा राजीनामा देऊ शकतात. याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे ट्विटही समोर आले होते, त्यानंतर उद्धव ठाकरे हे पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
त्याआधी महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता वर्तवली जात असून शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने’ असे त्यांनी ट्विट केले आहे. संजय राऊत यांनी ट्विट केले की, राजकीय घडामोडींमुळे विधानसभा बरखास्त होऊ शकते. त्याआधी मीडियासी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जास्तीत जास्त काय होईल, राज्यातील आमचे सरकार जाईल. आम्ही सत्तेत परत येऊ शकतो, पण पक्षाची प्रतिमा सर्वोच्च आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आसाममधील गुवाहाटीमध्ये 40 बंडखोर आमदार उपस्थित आहेत. सर्व आमदार बुधवारी पहाटे सुरतहून चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला पोहोचले होते. महाराष्ट्राच्या आमदारांना विमानतळावरून पोलीस संरक्षणात बसमधून एका आलिशान हॉटेलमध्ये नेण्यात आले. यापूर्वी बंडखोरी करताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अन्य अपक्ष आमदारांसह सूरत येथील हॉटेलमध्ये तळ ठोकला होता.