व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-निगडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, राहुलनगर येथे विठाबाई भीमराव धनवे, त्यांची मुलगी ज्योती रमेश अरुण, नातू महेश, नात विशाखा असे चौघे राहतात. ज्योती यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या आईकडेच राहत असून, त्या एका रुग्णालयात कामाला जात होत्या. मात्र, आई विठाबाई यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची सेवा करण्यासाठी रुग्णालयातील काम त्यांनी सोडले. विशाखा शिक्षण घेत आहे. तर महेश हा एका ठिकाणी कामाला जात असून, त्यावरच कुटुंबाचा गाडा हाकला जात आहे.
आईचे निधन झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या अस्थिविसर्जनासाठी सर्वजण गेलेले असतानाच घराला आग लागली.
काही क्षणात आगीने सर्व गृहोपयोगी साहित्य गिळंकृत केले. हातावर पोट असलेल्या या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. आई गेल्याच्या दुःखातून सावरत नाही, तोच नियतीने उघड्यावर आणले. ही दुर्दैवी घटना निगडी येथे घडली.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असून हातावर पोट आहे. आजारपणात विठाबाई यांचे रविवारी सकाळी निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवारी सकाळी अस्थिविसर्जनासाठी सर्वजण घराबाहेर पडले. त्याचवेळी या कुटुंबावर आणखी एक संकट ओढवले. घरात अचानक मोठी आग लागली. यामध्ये गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
काही वेळाने कुटुंबीय अस्थी विसर्जन करून घरी परतले असता, डोळ्यासमोर अंधार होता. गृहपयोगी वस्तू, कष्ट करून जमवलेले काही पैसे आगीने गिळंकृत केले होते. हे सर्व पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली.
आईच्या दुःखातून सावरत नाही ,तोच दुसरे मोठे संकट या कुटुंबावर ओढवले आहे. या संकटातून सावरण्यासाठी या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे.
घरातील भांडी, कपडे, दवाखान्यासाठी जमवलेले पैसे सर्वच या आगीत गेले. हातावर पोट आहे, इतके मोठे नुकसान झाल्याने आता काय करावे, काहीच सुचत नाही. आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे.
– ज्योती रमेश अरुण, निगडी.
Discussion about this post