व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –जानेवारी महिन्यातील दुबई दौऱ्यानंतर आता सुरत महापालिकेच्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी दि.30 जानेवारी रोजी रवाना झाले आहेत. प्रशासनाने दुबई दौऱ्याप्रमाणेच या दौऱ्याबाबतही प्रचंड गुप्तता पाळली आहे.
या दौऱ्यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता मनोज सेठिया, जलनिःसारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे, प्रमोद ओंभासे या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी गुजरातमधील सुरत महापालिकेच्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी गेले आहेत. दि. 30 जानेवारी ते दि. 2 फेब्रुवारी हा दौऱ्याचा कालावधी आहे.
प्रशासकीय राजवटीत जानेवारी महिन्यात आयुक्तांसह चार अधिकारी दुबई दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याला शहरातील राजकीय वतुर्ळातून कडाडून विरोध झाला. मात्र, त्यानंतरही आता चार अधिकारी सुरत दौऱ्यांवर गेल्याने प्रशासकीय राजवटीत दौरे जोरात असल्याची चर्चा महापालिका वतुर्ळात आहे.
Discussion about this post