आळंदी | (व्हीएसआरएस न्यूज) | यावेळी भाविकांनी श्रींना पुष्प व पुष्पहार अर्पण केले. आळंदी येथील श्री खंडोबा मंदिरात माघ पौर्णिमे निमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी माघ पौर्णिमे निमित्त श्रींना नारळ वाहून नैवेद्य दाखविले.
श्री खंडोबा उत्सवा निमित्त परंपरेने बारा गाड्यांचा कार्यक्रम मेदनकरवाडी मध्ये होत आहे. मंदिरा मध्ये भाविकांनी धार्मिक रूढी परंपरेने तळी भंडार केला. तसेच चाकण जवळील मेदनकरवाडी मध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी श्री खंडेबा उत्सवा निमित्ताने आळंदी परिसरातील भाविकाने आपल्या श्रेद्धेसह,वाजंत्र्यासह वाजत गाजत झेंडा हातात घेत नृत्य करत परंपरेने त्या (बगाडाचे) बैलगाड्याचे मेदनकरवाडीच्या दिशेने आळंदी मधून प्रस्थान केले.
Discussion about this post