व्हीएसआरएस मराठी न्युज -मुंबई महामार्गावर आकुर्डी येथील खंडाेबामाळ चौकात खंडोबा मंदिर आहे. येथील यात्रा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी दोन लाखाे भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसराम गर्दी होते.
आकुर्डी गावचे ग्रामदैवत व असंख्य नागरिकांचे कुलदैवत असणारे श्री खंडोबा देवाचा उत्सव आकुर्डी येथे मंगळवार दिनांक 16 व 17 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. यावेळी मनोरंजन व कुस्त्यांचा आखाडा आहे होणार आहे. अशी माहिती श्री खडोबा देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ आकुर्डी गाव यांनी दिली आहे.
16 जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता श्री खंडोबा मूर्तीला मंगलस्नान व महा अभिषेक सोहळा सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती व रात्री नऊ वाजता श्रींची पालखीचा भव्य ग्राम प्रदक्षिणा सोहळा होणार आहे. यावेळी महाकाल उज्जैन वादपथक यासह ढोल पथक, वाजंत्री गोंधळी, बँड, हालगी वादक व भव्य फायर शो होणार आहे.
बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता सिने अभिनेत्री राधिका पाटील व इतर कलाकारांचा लावण्य चंद्रा, भव्य लावण्य तारका हा मनोरंजनाचा कार्यक्रम खंडोबा येथील सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. यानंतर दुपारी तीन वाजता खंडोबा मंदिर शेजारील गाव जत्रा मैदान येथे भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा भरणार आहे.
कुस्त्यांच्या मैदानात नंबर एकची कुस्ती पैलवान माऊली जमदाडे (महान भारत केसरी गंगावेश तालीम कोल्हापूर) विरुद्ध पैलवान बालारफिक शेख (महाराष्ट्र केसरी हनुमान आखाडा पुणे) यांच्यामध्ये होणार आहे. क्रमांक दोनची कुस्ती पैलवान प्रसाद सस्ते (महाराष्ट्र चॅम्पियन मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल) विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर (हांडे तालीम सांगली) यांच्यामध्ये होणार आहे. क्रमांक तीनची कुस्ती पैलवान भैरू माने (महाराष्ट्र चॅम्पियन गंगावेश तालीम कोल्हापूर) विरुद्ध पैलवान सतपाल सोनटक्के (महाराष्ट्र चॅम्पियन सोलापूर) यांच्यामध्ये होणार आहे तर क्रमांक चारची कुस्ती पैलवान हनुमंत पुरी (महाराष्ट्र चॅम्पियन शिवराम दादा तालीम पुणे) विरुद्ध पैलवान विजय पुनिया (सीआरपीएफ हरियाणा) यांच्यामध्ये होणार आहे. या प्रमुख कुस्तीसह एकूण 56 नोंदणी कुस्ती होणार आहेत.
कुस्त्यांच्या आखाडासाठी दिलीपशेठ पांढरकर यांच्याकडून होंडा शाईन गाडी तसेच माजी नगरसेवक निलेश पांढरकर यांच्याकडून हिरो होंडा डीलक्स गाडी व सोमनाथ काळभोर यांच्याकडून 51 हजार रुपये किमतीची चांदीची गदा देण्यात येणार आहे. यासह अनेक मान्यवरांनी ट्रॉफी, चांदीची गदा व रोख बक्षिस दिलेली आहेत.
Discussion about this post