व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे सौर उर्जेवर चालणारे हवामान, वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सीयुएनवाय) आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या द्वारे या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
यूएस कॉन्सुलेट जनरल- मुंबई द्वारे ब्रॉन्क्स समुदायाला प्रदान केलेल्या अनुदानाद्वारे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प बीसीसी, सीयुएनवाय आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यातील सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. हा प्रकल्प सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे रसायनशास्त्र विभागप्रमुख, अर्थ आणि एन्व्हायरमेंटल सायन्स प्राध्यापक नील फिलिप्स आणि प्राध्यापक परिमिता सेन यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला आहे. हे हवामान केंद्र विस्तृत प्रमाणात हवामान संबंधी डेटा जसे तापमान, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरण, आर्द्रता आणि हवेची गुणवत्ता गोळा करणार आहे. जमा झालेला डेटा डेव्हीस वेदर लिंक ॲपद्वारे रिअल टाईम मध्ये उपलब्ध होणार असून, त्याचा फायदा हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त होणार आहे.
Discussion about this post