व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो स्थानकांत १०० वा एक्सलेटर (सरकता जिना) बसविण्याचे काम महामेट्रोकडून शुक्रवारी पूर्ण झाले.
दोन्ही शहरांतील मेट्रो प्रकल्पात एकूण ३३ स्थानके आहेत. त्यात एकूण १६६ एक्सलेटर बसविण्यात येणार आहेत. त्यातील शंभरावा एक्सलेटर दापोडी स्थानकात बसविण्यात आला. हा एक्सलेटर शिंडलर कंपनीच्या पुण्यातील कारखान्यात तयार करण्यात आला आहे. तसेच मेट्रो प्रकल्पांत एकूण १३७ लिफ्ट बसविण्यात येणार असून त्यापैकी ७१ लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत.
भविष्यात प्रवासी संख्या वाढू शकते, हे लक्षात घेऊन एक्सलेटर आणि लिफ्ट बसविण्यात येत आहेत. बसविण्यात आलेले शंभर एक्सलेटर हे ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत पुण्यात तयार झालेले आहेत. लिफ्ट आणि एक्सलेटरमुळे प्रवाशांना वेगाने मेट्रो स्थानकातील प्लॅटफॉर्मवर जाणे-येणे शक्य होणार आहे. तसेच दिव्यांगजन व जेष्ठ नागरिक कोणाच्याही मदतीशिवाय मेट्रो करू शकतील.
Discussion about this post