व्हीएसआरएस मराठी न्युज –महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअमचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
स्थापत्य क्रीडा विभागाच्या सुरू असलेल्या कामांच्या स्थळांची पाहणी खोराटे यांनी केली. तसेच, इतर कामांची माहिती घेऊन उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Discussion about this post