व्हीएसआरएस मराठी न्युज –जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या कालच्या (ता. १२) हत्येचा त्या घटनेचा आम्ही जाहिर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. कालच्या घटनेमध्ये कोण आरोपी आहेत. हि घटना का केली गेली. या मागची सत्यता काय आहे. त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे. कोण गुन्हेगार आहे. याची सखोल चौकशी पोलीस खात्यातील सर्व अधिकारी वर्ग प्रामाणिकपणे करण्याचे काम करीत आहेत. परंतु जी काही घटना घडली. या मावळ तालुक्याला माध्यमातुन कोणीही करु नये. या करिता आम्ही सातत्याने एक समंजस्यपणाची भूमिका घेवुन काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.” अशी प्रतिक्रिया मावळचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आज (ता. १३) रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत व्यक्त केली. वेगळा पायंडा
पाडण्याचे काम राजकारणाच्या किंवास माजकारणाच्या माध्यमातुन किंवा समाजकारणाच्या माध्यमातुन कोणीही करु नये. या करिता आम्ही सातत्याने एक समंजस्यपणाची भूमिका घेवुन काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.” अशी प्रतिक्रिया मावळचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आज (ता. १३) रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत व्यक्त केली.
मला एवढंच सांगायचे. मला या मायबाय जनतेने या सुनील शेळकेला आयत्यावेळी पक्षामध्ये दुसऱ्या येवुन सुद्धा ९४ हजार मतांनी निवडुन दिले. ते कोणाच्या जीवावर उठायला किंवा लुटमार करायला किंवा कोणाला फसवायला निवडुन दिले नाही. याची मला आजही जाणीव आहे. म्हणुन मी सातत्याने सांगत असतो. आपण राजकारण करत असताना आपण विकासाचे राजकारण केले पाहिजे. आपण आरोप प्रत्यारोप करत असतो. तरी ते तात्पुरते असले पाहिजेत. परंतु कामातुन आपले नेतृत्व, आपली आत्मिक शक्ती, आपली जबाबदारी हि दाखविली पाहिजे. आणि हे गेली ३ वर्ष मी हे दाखविण्याचे काम करीत आहे. मायबाप जनतेने निवडुन दिले कामांसाठी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्हांला न्याय मिळेल, आमच्या समस्या सुटतील. या भावनेतुन विश्वासाने माझ्या मायबाय जनतेने मला निवडुन दिले आहे. राजकारणातुन आलिप्त व्हायचे असेल…
तर आज होईल. मात्र बदनाम करुन अलिप्त करण्याचा प्रयत्न करीत असाल तर कदापी असले आरोप स्विकारणार नाही. कोणतीही चौकशी लागली, मला विचारणा करण्यात आली. तरी मी पोलीस विभागाला प्रत्येक यंत्रणेला पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. माझी चौकशी सखोल करा. यामधुन कोण गुन्हेगार आहे. याची देखील सखोल चौकशी करा. तसेच यामागे कोण राजकारण करीत असेल याची देखील चौकशी करा. जीवावर बेतणारे राजकारण नको. कोणाच्या जीवावर बेतल असे राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन. परंतु जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांना तशा प्रकारे उत्तर द्यायला मी तयार आहे. मी कायद्याने चालणारा माणुस आहे.”
Discussion about this post