व्हीएसआरएस मराठी न्युज –जालना जिल्ह्यातील विविध मागण्यासाठी मराठा समाजाचे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध आंदोलन केले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनाला विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, विशाल जाधव, संदीप चव्हाण, अनिल भोसले, शिवाजी पाडाळे, ओम शिरसागर, विकास कांबळे, रजनीकांत गायकवाड, मयूर खरात, अमोल बेंद्रे, शाहिद शेख, पियूष अंकुश, स्वप्नाली आसोले, बिरुदास मोटे, काशिनाथ जगताप, राजेश हरगुडे, नितीन मोटे आदी उपस्थित होते.
Discussion about this post