व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने निगडी, प्राधिकरणात टिळक यांचा पुणाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मानस आहे. त्यासाठी महापालिका स्थापत्य ‘अ’ मुख्यालयातर्फे निविदा मागविण्यात आल्या. मूळ 45 लाख 52 हजार 324 रुपये किंमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरीअल टेस्टिंग चार्जेस वगळून 45 लाख 10 हजार 347 रुपयांवर निविदा मागविण्यात आल्या होत्या त्यानुसार मेसर्स अनुश एंटरप्राईजेस, मेसर्स ईश्वर सखाराम चौधरी, मेसर्स पी. ए. शिरोळे इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर आणि मेसर्स पी. एन. नागणे या चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.
त्यामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 14.99 टक्के कमी दराची निविदा मेसर्स अनुश एंटरप्राईजेस या कंपनीने सादर केली. त्यांनी हे काम 38 लाख 34 हजार 246 रुपये अधिक 9 हजार 77 रुपये रॉयल्टी आणि 32 हजार 900 रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस असे एकूण 38 लाख 76 हजार 223 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे.
त्यामुळे निगडी प्राधिकरणात लोकमान्य टिळक यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम मेसर्स अनुश एंटरप्राईजेस यांच्याकडूनच करून देण्यात आले.
Discussion about this post