व्हीएसआरएस मराठी न्युज -बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोकुळजी गायकवाड होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कांबळे व सचिव लहूजी कांबळे तसेच पद्माटेक कंपनीचे संचालक किशोर नवले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका योगिताताई नागरगोजे, चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. प्रकाश जाधव, नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रजिस्टर महसूल विभाग सेवेमध्ये रुजू झालेले दयानंद जावळे , संस्थेच्या सल्लागार मा. ज्योती कांबळे मॅडम, संस्थेचे सदस्य अमोल शिंदे, लहू गायकवाड, समाजसेविका सारिका पवार,अर्चना सोनार, सेवानिवृत्त शिक्षक विकास मस्के, दामिनी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री आहेर ,राजे शिवराय विद्यालय घेरापानवडीचे मुख्याध्यापक ए.यू. कांबळे, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय खानवडीचे मुख्याध्यापक किसन लोणकर, माध्यमिक विद्यालय सांगीसे च्या प्रभारी मुख्याध्यापिका मा. सुनीता वंजारी, तसेच राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.बाबाजी शिंदे इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेविका योगीताताई नागरगोजे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले. MPSC परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये भरती झालेले जावळे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. नुकतीच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस मध्ये भरती झालेली राजर्षी शाहू महाराज विद्यालयाची माजी विद्यार्थीनी श्वेता दळवी हीचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळजी गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराज विद्यालय व ज्ञानदा प्राथमिक विद्यालयातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय जोशपूर्ण व उत्साहात तसेच आल्हाददायक वातावरणात विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पाडला. शेवटी कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदा प्राथमिकच्या मुख्याध्यापिका निता शिंदे, सहशिक्षक दिपक जरे, मोनिका सुतार , शितल शिंदे गायत्री हदपद,शुभांगी शेंडगे माध्यमिक विभागाचे स्वाती पाटील, सुजाता जोगदंड, रुपाली पवार, संदीप बोर्गे, मिलिंद चोरगे, उमेश माने, कोमल गायकवाड, जितेंद्र सूर्यवंशी, किशोर बडे, संगीता शिंदे, दैवशाला चोले, मोहिनी चव्हाण , शिल्पा कासार, , जयश्री महानवर, अमोल सूर्यवंशी, प्रमोद रायकर, धुडकू कुवर, नाना शिंदे, नारायण हिरगुडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव झेंडे व पुनम तारख यांनी केले व आभार सहशिक्षक सुभाष कावळे यांनी मानले.
Discussion about this post