व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी महानगरपालिका तर्फे अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या के. एस. बी चौक येथील प्रतिमेस अति. आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सचिव हनुमंत तरडे, सामाजिक कार्यकर्ते संपत धोंडे, शंकर निकम, किशोर सातकर, लहू पवार, पांडूरंग करणे, दिलीप घोटकुले, शंकर शेलार इ. उपस्थित होते.
Discussion about this post