पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) |. यामध्ये घरकुल, भोसरी, निगडी बसथांब्यावरून या बस मार्गस्थ होणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील चार मार्गांवर बसची एक फेरी वाढविण्याच्या निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांनी केलेल्या मागणीनुसार शुक्रवार (दि. 3) पासून या बसच्या फेर्या सुरू होणार आहेतपिंपरी-चिंचवड शहरात काही मार्गावर कोरोना काळात बसच्या फेर्या थांबविण्यात आल्या होत्या. आता पूर्वीसारखे सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे.
मात्र, फेर्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बसच्या फेर्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशी करत होते. त्यानुसार बसच्या फेर्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने केला आहे. त्यानुसार घरकुल वसाहत ते पिंपरीगाव या मार्गावर बसची फेरी वाढविण्यात आली आहे.
ही बस केएसबी चौक, पिंपरी न्यायालय मार्गावर मार्गस्थ होणार आहे. दुसरी बस भोसरी ते चिखली मार्गावर धावणार आहे. मोशी बाजारपेठ, बोर्हाडे वस्ती मार्गावरून ही बस जाणार आहे. भोसरी ते कोथरूड डेपो मार्गे पिंपळे गुरव, औंध, सेनापती बापट रोडवर एक बस मार्गस्थ होणार आहे. तर निगडी ते ग्रीनबेस कंपनी, निगडी ते नवलाख उंबरे या मार्गावर या बसची सुविधा देण्यात येणार आहे.
Discussion about this post