व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन दि.१९ नोव्हेंबर ज्येष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर यांच्या हस्ते थेरगाव भागातील शंकरराव गावडे कामगार भवनात सकाळी साडेदहा वाजता आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून एस.एम.देशमुख हे कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषविणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवडच्या थेरगाव भागातील शंकरराव गावडे कामगार भवनात सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, प्रमोद नाना भानगिरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या या सत्रात ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोगदेव यांना पवना समाचारकार भा. वि. कांबळे जीवनगौरव पुरस्काराने आणि स्वातंत्र्यसैनिक कै. साथी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार लोकसत्ताचे पत्रकार संदीप आचार्य यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखती आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किरण नाईक, शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, बाळासाहेब ढसाळ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आदिंनी केले आहे.
Discussion about this post