व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकला. लिपिकाला ताब्यात घेवून चौकशी सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिका-याचीही चौकशी सुरु असल्याचे समजते.
मार्चअखेर असल्यामुळे महापालिकेत ठेकेदारांची बीले काढण्यासाठी धावपळ सुरु आहे. महापालिकेच्या लेखा विभागात बिले सादर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ठेकेदारांची लगबग सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागात आज दुपारी एसीबीच्या पथकाने टाकलेल्या छापामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Discussion about this post