Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने कर थकविणार्या २०० थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या असून १७ नळजोडण्याही तोडल्या आहेत. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मालमत्ताकर वेळीच भरावा असे आवाहन सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.
शहरात एकूण ६ लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. आजवर करसंकलन विभागाने ६८० कोटी रुपये करापोटी गोळा केले आहेत. ३३ हजार २४१ थकबाकीदारांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे ५८४ कोटी रुपये कर थकित आहे. ७ भजार ८० जणांनी नोटीस मिळाल्यानंतर कर भरला. त्याची एकूण रक्कम ७३ कोटी २८ लाख आहे. नोटीसा दिल्यानंतरही कर न भरणार्यांवर पालिकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
फुगेवाडीतील 38, किवळे येथील 32 आणि मोशीतील 29 मिळकती सील करण्यात आल्या आहेत.
Discussion about this post