Pimpri News : पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रधानमंत्री…प्रधानसेवक या प्रदर्शनाचे आयोजन ५ ते ७ जानेवारी या कालावधीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी विधानसभेचे भाजपचे निवडणूक प्रभारी अमित गोरखे, नितीन चिलवंत आणि शिवकुमार सिंग बैस हे प्रदर्शनाचे आयोजक आहेत.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ५ रोजी सकाळी साडेदहा वाजता श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, अॅड. सचिन पटवर्धन,वर्षा डहाळे आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शन विनामूल्य आहे अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली.
Discussion about this post