Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नामवंत सनई, चौघडा वादक रमेश पाचंगे यांची सेवा अयोध्या येथे थेट प्रभू श्रीराम चरणी रुजू होणार आहे.
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान चौघडा आणि तुतारी वादनासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.या निमित्त माजी नगरसेविका ज्योति भारती यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आकाश भारती यांनी पाचंगे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी प्रवचनकार शारदा मुंडे आणि कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
पाचंगे यांना प्रवासाचे तिकिट आणि सुरक्षापास पाठविण्यात आले असून, निवासव्यवस्थाही करण्यात आली आहे. ते अयोध्येकडे निघाले आहेत.
या संदर्भात पाचंगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अवघ्या देशातील भाविकांचे लक्ष लागलेल्या या सोहळ्यात प्रभू श्रीरामांच्या चरणी सेवा रुजू करण्याचे भाग्य मला लाभत आहे.माझ्या आयुष्यातील हा सर्वात भाग्याचा क्षण आहे. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी माझी चौघडा आणि तुतारी वादनासाठी शिफारस केली. मी आता अयोध्येला निघालो असून प्रवासात आहे.
Discussion about this post