Pimpri News : पिंपरी : मुंबई पुणे द्रुतगतीमार्गावर खोपोली नजिक नवीन बोगद्यामध्ये ७ एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास एक टेम्पो पुढे जाणार्या कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त टेम्पो क्रमांक जीजे 15/एक्सएक्स 9283 हा विनोद यादव, (राहणार वापी, गुजराथ) हा पुण्याकडून मुंबईच्या दिशेने घेऊन जात होता. खोपोलीनजिकच्या नवीन बोगद्यात त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. आणि, टेम्पो पुढे जाणारा कंटेनर क्रमांक एमएच 46/बीएम 1169 वर मागून आदळला. या अपघातात टेम्पोची केबीन चेपली गेली. त्यात अडकून टेम्पोचालक विनोद यादवचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली.अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत टीम, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, रुग्णवाहिका, मृत्युंजय देवदूत टीमने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
Discussion about this post