Pimpri News : पिंपरी : सहायक पोलीस आयुक्तांसाठी लाच स्वीकारणार्यास अटक झाल्यानंतर त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात उमटले आहेत. सहायक आयुक्तांसह अन्य दोन अधिकार्यांवर कारवाई झाली आहे.
सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक वसंत देवकाते यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले असून उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना निलंबित करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये एकाला लाच स्वीकारताना पकडले होते. या प्रकरणातील पकडलेल्या व्यक्तीने ही लाच आपण मुगुटलाल पाटील यांच्यासाठी स्वीकारल्याचे सांगितल्याने त्यांचे नाव चर्चेत आले होते.
हा प्रकारानंतर पाटील यांच्यासह देवकाते यांची बदली करण्यात आली असून धोत्रे यांना निलंबित करण्यात आले आहे.
Discussion about this post