व्हीएसआरएस मराठी न्युज -छठ पूजेच्या (छठ पूजा 2023) उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. छठपूजेच्या तयारीबाबत पोलीस-प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे. भोसरी पोलीस यंत्रणेचा आढावा घेत आहे.मा बापू बांगर डॉ विवेक मुगळीकर सर, निकाळे साहेब त्यांच्यासह पोलीस प्रशासनाने घाटावर पोहोचून मोशी घाटावरील छठपूजेच्या तयारीचा आढावा घेतला.
छटपुजा उत्सवानिमित्त विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर रविवारी (दि.१९)सायंकाळी पाच वाजता ‘भव्य काशी गंगा आरती’चे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवणाऱ्या विश्व श्रीराम सेना या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पालघर हिंदूशक्ती पीठ येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अर्जुन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भारतीय खाद्य महामंडळ महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य व विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संयोजक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
Discussion about this post